राजकीयजळगांवसामाजिक

भारतीय जनता पक्षाला समस्त शिंपी समाजाचा जाहीर पाठिंबा

खान्देश टाइम्स न्यूज l ०३ मे २०२४ l अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने आज दिनांक 3 मे रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा आ चंद्रशेखरजी बावनकुळे यांना शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष मा अॅड महेश जी ढवळे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर संघटन मंत्री मनोज भांडारकर विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला देश ,राष्ट्र, धर्म , या साठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून सबका साथ सबका विकास या भावनेने देशाचे यशस्वी पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला असून जळगाव जिल्ह्यातील रावेर,व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ खा रक्षाताई खडसे जाहीर पाठिंबा देत असल्याचे अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे या प्रसंगी जळगाव शहर मा समाजध्यक्ष मुकूंद मेटकर, शरदराव बिरारी ,प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी अनिल खैरनार, सदस्य किरण शिंपी संजय शिंदे,महेश कापुरे , अशोक सोनवणे, सुधाकर कापुरे, गिरीश देवरे, चंद्रशेखर कापडे या सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button