निंभोरा विकासो नवनिर्वाचीत चेअरमन पदी भगवान अर्जुन पाटील तर व्हा. चेअरमन पदी भगवान व्यंकट पाटील यांची बिनविरोध निवड
जळगांव l भडगाव l १० जून २०२३ l प्रतिनिधी l तालुक्यातील निंभोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी भगवान अर्जुन पाटील तर नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन पदी भगवान व्यंकट पाटील या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. नवनिर्वाचीत चेअरमन भगवान पाटील व नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन भगवान पाटील या दोघांचा संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. निंबा शिवराम पाटील यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा व बालु शंकर पाटील यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ही रिक्त जागेसाठी नविन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचा निवडीचा कार्यक्रम झाला. यावेळी संचालक निंबा शिवराम पाटील, बालु शंकर पाटील, दिलीप मन्साराम पाटील, भगवान अर्जुन पाटील, महादु कौतीक पाटील, साहेबराव चिंतामण पाटील, भारत आत्माराम पाटील, भाऊसाहेब बाबुलाल पाटील, भगवान व्यंकट पाटील, धुडकु पोपट मोरे, आशाबाई शिवाजी पाटील, प्रमिलाबाई उत्तम पाटील, आदि संचालक, तसेच तज्ञ संचालक भिकमचंद गुलाबचंद जैन व नागरीक उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अविनाश पाटील यांनी निवडीचे कामकाज पाहीले. त्यांना संस्थेचे सचिव दत्ता पाटील यांनी सहकार्य केले. संस्थेचे क्लर्क पांडुरंग वाघ, सेवक विलास पाटील या कर्मचार्यांनी विशेष परीश्रम घेतले.