जळगाव ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रतिबंधित नायलॉन माझ्या विक्री करणाऱ्या जळगाव शहरातील जोशी पेठ आणि भुसावळ्यातील सराफ बाजार आदीं तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून कारवाई केल्याने पतंग व मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आकाशात पतंग उडवण्यास सुरुवात झाली असून विविध प्रकारचे मांजा विक्रीसाठी आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात कारवाई करून किरण भगवान राठोड याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपयांचे १६ नायलॉन मांजा चक्री जप्त केल्या आहेत.
जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात कुणाल नंदकिशोर साखला याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ हजार ८०० रुपयांचे ३२ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाने भुसावळ शहरात भज्जेगल्ली सराफ बाजारातील अजय काईट नावाचे दुकानावर छापा टाकुन नितीन गोपाळ पतकी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून १ हजार ४०० रुपयांच्या ६ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत.
यांनी केले कारवाई
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, पोहेकॉ हरीलाल पाटील, प्रदिप सपकाळे, प्रदिप चवरे, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ यांनी केली आहे.