जळगाव;-भारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क आणि संरक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जातो.
अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करताना सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि सामाजिक विविधता ओळखणे आणि ते साजरे करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो. यावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांनी या दिवसाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तिखार गुलाम रसूल यांनी केले. काझी जमीरुद्दीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात इकरा डी.एड महाविद्यालयाचे अध्यक्ष अब्दुल रशीद शेख, इकरा बीएडचे प्राध्यापक अजीम शेख, इकरा शाहीनचे झाकीर बशीर यांनी सहभाग घेतला.