शाळेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणान्यांवर शनिपेठ पोलीसांनी अतिक्रम विभागाच्या मदतीने कारवाई केली. या कारवाईत सहा टपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्या टपरी कायमस्वरुपी हटवून त्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतल्या आहेत.
शहरातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसारशनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ भारबळे, सपोनि साजीद मंसुरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे यांच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौने शाळा, मनपाची १० क्रमांकाच्या शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य आहेत.
पदार्थ विक्री करणाऱ्या टपरी चालकांवर यापूर्वी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरी देखील ते पदाथांची विक्री सुरुच ठेवल्यामुळे गुरुवारी या शाळांच्या शंभर मिटर परिसराच्या आत असलेल्या सहा टपरी चालकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करुन त्या जप्त करण्यात आल्या
यांच्यावर झाली कारवाई
या कारवाईमध्ये चौबे शाळेजवळील इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा, भिका लिंगा गवळी रा. गवळीवाडा, गणी मोहमद डिगी रा. मिलपुरा तर मनपाच्या १० नंबर शाळेच्या परिसरातील प्रकाश नामदेव पाटील रा. बळीराम पेठ, अब्दुल करीम शेख इसा रा. काट्याफाईल यांच्याविरुद्ध कारवाई करुन त्यांची टपरी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील दोन दिवसात इतर शाळांच्या हद्दीतील पानटपरी चालकांवर कारवाई करण्याचा इशारा शनिपेठ पोलिसांनी दिला