इतर

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात ; सर्वसामान्यांना दिलासा नाहीच !  

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात ; सर्वसामान्यांना दिलासा नाहीच !  

जाणून घ्या आजपासूनचे दर 

जळगाव प्रतिनिधी l१ जुलै २०२५ । जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी दरात मोठा बदल झालाय… पण तो सर्वांसाठी नाही! दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या एलपीजी दरांचे पुनर्निरीक्षण करत असतात. त्यानुसार आजपासून (१ जुलै) नव्या दरांची अंमलबजावणी झाली असून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, सामान्य ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही, कारण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ऑइल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता ₹१७२३.५० रुपयांवरून थेट ₹१६६५ झाली आहे. मुंबईत ही किंमत आता ₹१६१६ इतकी झाली आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत ₹५७ रुपयांनी घसरून ₹१७६९ वर आली आहे. याआधी १ जून रोजीही व्यावसायिक सिलिंडर ₹२४ रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता.

या दरकपातीचा थेट फायदा हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालकांसारख्या व्यवसायिकांना होणार आहे. कमर्शियल गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर खाद्यव्यवसायात केला जातो. त्यामुळे त्यांच्या रोजच्या खर्चात थेट बचत होणार आहे.

दुसरीकडे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे दर महिन्याला गॅससाठी येणारा खर्च तसाच राहणार आहे.

एकंदरीत, व्यावसायिकांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी सर्वसामान्यांसाठी ही एक ‘वेट अँड वॉच’ स्थितीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button