
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी मजहर पठाण यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेवरील पकड आणि गेल्या काही वर्षांतील सक्रिय कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
बुधवार, १७ डिसेंबर २०२५ रोजी पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली आणि पठाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती :
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने रवींद्र भैय्या पाटील (प्रदेश सरचिटणीस), एजाज मलिक (महानगराध्यक्ष), सय्यद अन्सार (अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष), अशोक लाडवंजारी (माजी महानगराध्यक्ष), डॉ. रिजवान खाटीक (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष), यासोबतच संग्राम जगताप, रमेश पाटील, रिकु चौधरी, सुनील माळी, रमेश बहारे, राजू मोरे, मोहसीन शेख, सलीम शेख,सईद खान, राजा मिर्झा, जोहेद शेख यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीचे महत्त्व :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने हा निर्णय घेतल्याचे समजते. मजहर पठाण यांनी यापूर्वीही अल्पसंख्यांक समाजात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या फेरनिवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“पक्ष नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” – मजहर पठाण, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग)





