इतर

जळगावच्या रस्त्यांसाठी पुन्हा १०० कोटींचा निधी – ना. गिरीश महाजन

जळगावच्या रस्त्यांसाठी पुन्हा १०० कोटींचा निधी – ना. गिरीश महाजन

चार महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण; टेक्स्टाईल पार्कमुळे रोजगार वाढणार

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या चार महिन्यांत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश संघटनमंत्री विजय चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून काही रस्त्यांचे काम सुरू आहे. आता नव्याने मंजूर १०० कोटी रुपये आठ दिवसांत उपलब्ध होणार असून, येत्या चार महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण होतील.‘टी’
शिवाजीनगरातील ‘

आकाराच्या पूल प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये मतभेद असले तरी त्यांच्याशी चर्चा करून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे महाजन यांनी सांगितले.

जामनेर येथील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कबाबत बोलताना महाजन म्हणाले की, पुढील महिन्यापासून पहिला प्रकल्प कार्यान्वित होईल. जमिनीच्या किमती ५० टक्क्यांनी कमी केल्याने अनेक नामांकित उद्योग समूह येथे गुंतवणुकीस तयार आहेत. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असल्याचे महाजन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना नियमित खते, बियाणे मिळत असून, उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर २,५०० रुपये थेट जमा होत असून, लवकरच ही रक्कम २,१०० रुपये प्रतिमहा होणार आहे. कर्जमाफीचा लाभही लवकरच मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या ‘गरीबी हटाव’ घोषणेवर टीका करताना महाजन म्हणाले की, ती केवळ घोषणाच राहिली. मोदी सरकारने मोफत धान्य, उज्ज्वला गॅस, शौचालय योजना, जनधन खाते यांसारख्या योजनांद्वारे गरीबांचे जीवनमान उंचावले आहे. गरीबीचे समूळ उच्चाटन हेच सरकारचे ध्येय आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button