इतर

सावकाराकडून एकाला प्लास्टिक पाईपने अमानुष मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सावकाराकडून एकाला प्लास्टिक पाईपने अमानुष मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – अवैध सावकारीच्या पैशांच्या वादातून एका नागरिकाला जबरदस्तीने नेऊन त्याला अश्लील शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईपने अमानुष मारहाण केल्याची घटना कोंबडी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश अशोम मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय आहे. त्यांनी २०१६ मध्ये सागर सपके (रा. अयोध्या नगर) याच्याकडून दहा टक्के महिना व्याजदराने ९० हजार रुपये घेतले होते. मराठे यांनी व्याजासह मूळ रक्कम चार टप्प्यांत परत केली होती. मात्र तरीही सावकाराने वाद निर्माण करून त्यांच्यावर हल्ला केला.

दि. २८ रोजी महेश मराठे हे कामानिमित्त गोलाणी मार्केट येथे मित्राला भेटण्यासाठी जात असताना (एमएच १९ बीवाय ११११ क्रमांकाच्या बुलेटवरून) सागर सपके आणि त्याचा साथीदार राधेश्याम शर्मा यांनी त्यांना रस्त्यात अडवले. आवाज देत जबरदस्तीने त्यांना दुचाकीवर बसवून कोंबडी बाजार परिसरातील एका घराजवळ नेले.

तेथे सागर सपकेने अश्लील शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. राधेश्याम शर्मा याने पत्र्यावर ठेवलेला प्लास्टिक पाईप आणून दिला, ज्याचा वापर करून सागर सपकेने मराठे यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर जोरदार मारहाण केली.

मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने महेश मराठे यांनी आपला जीव वाचवण्यासाठी राहिलेल्या पैशांची परतफेड करण्याची विनवणी केली. मारहाणीनंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आणि उपचारानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी महेश मराठे यांच्या तक्रारीवरून सागर सपके आणि राधेश्याम शर्मा यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button