खान्देशजळगांवसामाजिक

मुख्यमंत्री सहायता निधीतून जळगावात गरजू रुग्णांना आर्थिक मदत पत्रांचे वाटप

मुख्यमंत्री सहायता निधीतून जळगावात गरजू रुग्णांना आर्थिक मदत पत्रांचे वाटप

जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे 2025 रोजी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सुरू झाला. जिल्ह्यात प्रथमच सुरू झालेल्या या उपक्रमामुळे रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आता जिल्हास्तरावरच सुलभ झाली आहे.या कक्षामार्फत आतापर्यंत 21 अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून, पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाइकांना 16 मे 2025 रोजी मुख्यमंत्री सहायता निधीची पत्रे प्रदान करण्यात आली.

ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेणारे दौलत बंडू सोनवणे आणि न्युक्लियस हॉस्पिटल येथील जिजाबाई अशोक पाटील यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य पत्र जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यापूर्वी ही प्रक्रिया मुंबई येथे होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना वेळ, खर्च आणि गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा आता जिल्हास्तरावर उपलब्ध झाली आहे.

यामुळे गरजू रुग्णांना त्वरित मदत मिळणे शक्य झाले आहे. रुग्ण आणि नातेवाइकांनी या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

संपर्क :
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव
संपर्क क्रमांक: 9309844510
ई-मेल: jalgaoncmrf@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button