खान्देशगुन्हेजळगांव

जुन्या बसस्थानक परिसरात ‘संघवी पाईप’च्या इलेक्ट्रिक पॅनलला आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

जुन्या बसस्थानक परिसरात ‘संघवी पाईप’च्या इलेक्ट्रिक पॅनलला आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव : शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील ‘संघवी पाईप’ या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक पॅनलला शनिवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील दुकाने वाचली आहेत. दरम्यान, या आगीत दुकानधारकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८:५५ वाजता हर्षल जैन यांनी अग्निशमन विभागाला दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. जुन्या बसस्थानकासमोरील ‘संघवी पाईप’ येथील इलेक्ट्रिक पॅनलमध्ये ठिणग्या पडून आग लागल्याने वर्दळीच्या ठिकाणी काही काळ घबराट निर्माण झाली होती.

खबर मिळताच अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. इलेक्ट्रिक पॅनलची आग असल्याने पाण्याचा वापर टाळत पथकाने अत्यंत कौशल्याने DCP (ड्राय केमिकल पावडर) फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या प्रयत्नांमुळे आग अल्पावधीत पूर्णपणे विझवण्यात यश आले.

या मोहिमेत वाहन चालक प्रकाश चव्हाण, मयूर ओतारी तसेच फायरमन भूषण पाटील, नितीन ससाने आणि रूपेश पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, इलेक्ट्रिक पॅनलमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button