इतर

जळगाव आरटीओला नवे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी; योगेश ताटू यांची नियुक्ती

जळगाव आरटीओला नवे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी; योगेश ताटू यांची नियुक्ती

जळगाव | प्रतिनिधी

राज्याच्या मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पदस्थापनेचे आदेश गुरुवारी (१९ जून) जारी करण्यात आले असून, जळगाव प्रदेशिक परिवहन कार्यालयाला नवे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले आहेत. या आदेशानुसार योगेश ताटू यांची जळगाव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उत्तम जाधव यांची भडगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मोटार वाहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती देत राज्यभरातील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले. या फेरबदलात जळगावचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांची नागपूर (ग्रामीण) येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, बोरोली येथे कार्यरत असलेले योगेश ताटू यांना पदोन्नती देत जळगाव प्रदेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नंदुरबार येथे कार्यरत असलेले उत्तम जाधव यांची भडगाव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार पदोन्नती मिळालेल्या व बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे जळगाव आणि परिसरातील परिवहन प्रशासनाला नव्या नेतृत्वाची साथ मिळणार असून विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 राज्यभरातील ३८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मोटार वाहन विभागाने राज्यभरातील ३८ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती देत विविध ठिकाणी नियुक्ती व बदलीचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button