जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटने तर्फे अधिक्षक समाज कल्याण लेकीचा सत्कार

जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटने तर्फे अधिक्षक समाज कल्याण लेकीचा सत्कार
जळगाव प्रतिनिधी Iमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सन २०२५ च्या परिक्षामध्ये उत्तीर्ण होवून महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात अधिक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कु.मेघा मिंलीद नाईक हिचा जिल्हा वंजारी युवा संघटना तर्फे सत्कार नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सत्कार केला. कु.मेघा मिलींद नाईक ह्या वंजारी समाजातील लेकीने घवघवीत यश प्राप्त करून शासनाच्या समाज कल्याण विभागात अधिक्षक पदावर मिळवण्याचा मान मिळवला आहे. अशा सर्व लेकरांचा सत्कार करणे हे आमचे परमभाग्य व कर्तव्य आहे .असे प्रशांत नाईक यांनी सांगितले.प्रशांत नाईक, नामदेव वंजारी ,महादू सोनवणे, चंदुलाल सानप ,संतोष घुगे, भानुदास नाईक, उमेश आंधळे, रामेश्वर पाटील, रवींद्र सानप, मिलिंद नाईक, श्रीमती सुनंदा नाईक, सौ संगीता भानुदास नाईक यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. कु.मेघाला वंजारी युवा संघटनेतर्फे भावी वाटचालीसाठी तिला सन्मानपत्र व सत्कार करण्यात आला.





