खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची DySP पदावर पदोन्नती

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची DySP पदावर पदोन्नती

जळगाव | प्रतिनिधी

राज्य पोलीस दलातील चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) पदावर पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना नव्या जबाबदाऱ्यांसह नियुक्तीही करण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होणार आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सुनील पाटील (PTS खंडाळा) यांची चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद वाघ (पिंपरी-चिंचवड) यांची मुक्ताईनगर SDPO म्हणून नियुक्ती झाली आहे.

तसेच, संजय गायकवाड, जे सध्या तात्पुरत्या स्वरूपात CTB जळगाव येथे कार्यरत आहेत, यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सतीश गोरडे यांच्याकडे नाशिक येथील सायबर व अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. नव्या पदावर कार्यभार स्वीकारल्यानंतर हे अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी आणि प्रभावी पोलीस प्रशासनासाठी अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button