खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव शहरात चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी, दोघांना अटक

जळगाव शहरात चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी, दोघांना अटक

सिंधी कॉलनी परिसरात प्राणघातक हल्ल्याने खळबळ; एमआयडीसी पोलिसांची तातडीची कारवाई

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भरचौकात झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाबा नगर परिसरातील कंपाऊंडमध्ये गप्पा मारत असलेल्या राहुल खिवलानी या तरुणावर सुनील तडवी आणि सतराज गायकवाड या दोघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.

हल्लेखोर रिक्षाने घटनास्थळी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. त्यांनी महामार्गावरील झुडिओ शोरूमजवळ वाहन थांबवून परिसरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राहुलला पकडून “आज तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत थेट छातीवर चाकूने वार केला.

मित्रांच्या तत्परतेमुळे प्राण वाचले
हल्ल्यानंतर राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचे मित्र घटनास्थळी धावून आल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मित्रांनी तातडीने जखमी राहुलला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले.

एमआयडीसी पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना उशिरा अटक केली आहे. दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button