खान्देशगुन्हेजळगांव

मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील महत्त्वाच्या फाईली चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील महत्त्वाच्या फाईली चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील रेकॉर्ड रूममधून सन 2006 मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मूळ फाईली गायब झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमोल वसंतराव पाटील (वय 32), नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक (नगर रचनाकार), जळगाव महानगरपालिका यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 200/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रचनाकार विभागातील अभिलेख व कागदपत्रे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात. सन 2006 मधील मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील गट क्रमांक 337/3 अ/1 आणि 337/3 अ/2 या गटांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फाईलीही याच रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
दि. 31 जानेवारी 2024 पासून न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित फाईलींची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, त्या उपलब्ध न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण अभिलेख विभागात शोध घेण्यात आला. तरीदेखील संबंधित फाईली सापडल्या नाहीत.

यावरून दि. 31 जानेवारी 2024 ते दि. 2 जुलै 2026 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून संबंधित फाईली विनापरवानगी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button