खान्देशगुन्हेजळगांव

एटीएममध्ये कार्ड बदलून ८० हजारांची फसवणूक; जळगावातील धक्कादायक प्रकार

एटीएममध्ये कार्ड बदलून ८० हजारांची फसवणूक; जळगावातील धक्कादायक प्रकार

मदतीच्या बहाण्याने अनोळखी तरुणाने बदलले कार्ड; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने एका अनोळखी तरुणाने खातेदाराचे एटीएम कार्ड बदलून ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदतीच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल

भुसावळ येथील अष्टविनायक कॉलनीतील रहिवासी पुरुषोत्तम वसंत तळेले (वय ५४) हे १० जुलै रोजी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला. त्याने चलाखीने फिर्यादींचे एटीएम कार्ड बदलून घेतले.

आठ व्यवहारांत ८० हजारांची रक्कम काढली

कार्डची अदलाबदल केल्यानंतर संबंधिताने फिर्यादींच्या खात्यातून प्रत्येकी १० हजार रुपयांचे आठ व्यवहार करून एकूण ८० हजार रुपये काढल्याचे उघड झाले. फसवणुकीची माहिती मिळताच फिर्यादींनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी १० जुलै रोजी रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button