खान्देशगुन्हेजळगांव

40 रुपयांच्या वादातून अल्पवयीनावर चाकू हल्ला; जळगाव शहर हादरले

40 रुपयांच्या वादातून अल्पवयीनावर चाकू हल्ला; जळगाव शहर हादरले

क्रिकेट स्पर्धेतील फीच्या वादातून उस्मानिया पार्कमध्ये घटना; 17 वर्षीय मुलावर सपासप वार, संशयिताविरुद्ध गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अवघ्या 40 रुपयांच्या वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सैय्यद अरहन अली सैय्यद नाजिम अली (वय 17, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, 12 जुलै रोजी परिसरात प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक संघाकडून 100 रुपये प्रवेश शुल्क घेण्यात आले होते. संशयिताने आपल्या संघाकडून 60 रुपये भरले होते, तर उर्वरित 40 रुपये नंतर देण्याचे सांगितले होते.

40 रुपये मागितल्याचा राग

स्पर्धेची अंतिम फेरी जिंकल्यानंतर फिर्यादीने संशयिताकडे उर्वरित 40 रुपयांची मागणी केली. रात्री सुमारे 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान उस्मानिया पार्क येथील सुन्नी मशिदीजवळ दोघांची भेट झाली. त्यावेळी संशयिताने “पैसे आणतो” असे सांगून पार्किंगमध्ये जाऊन चाकू घेऊन परत येत फिर्यादीवर अचानक हल्ला केला.

शरीराच्या अनेक भागांवर वार

हल्ल्यात फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या मांडीवर, पोटरीवर, उजव्या भुवईवर, डोक्यावर, छातीवर, डाव्या हातावर तसेच उजव्या हाताच्या बोटावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला त्याच्या मामाने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेवेळी अरबाज पाशा आणि अमन पिंजारी हे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असल्याचे फिर्यादीने जबाबात नमूद केले आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 212/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 118(2) नुसार गुलाम हुसेन शेख इरफान मुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश सोनी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button