खान्देशगुन्हेजळगांवराजकीयशासकीय

मतदार यादी विशेष पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मतदार यादी विशेष पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

जळगाव | प्रतिनिधी

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख गृहित धरून विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचा सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट २०२६ पासून बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघर जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर मतदान केंद्रांचे युक्तीकरण व पुनर्रचना केली जाईल.

१७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी मतदार यादीचा मसुदा प्रकाशित करण्यात येणार असून, १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी करून त्यांचा निपटारा केला जाईल.

भारत निवडणूक आयोगाने हा सुधारित कार्यक्रम सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी देण्याचे तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button