इतर

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; ममुराबाद येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; ममुराबाद येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण

*जळगाव,*प्रतिनिधी)*: जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी समाजाच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात आली होती. त्याच सामाजिक बांधिलकीचा पुढचा टप्पा म्हणून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी ममुराबादचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाचे जळगाव महानगर अध्यक्ष विक्रम कापडणे, सतीश सैंदाणे, भूषण बोरसे, अशोक मोरे, प्रकाश माळी, मच्छिंद्र सोनवणे, सुकलाल माळी तसेच ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रविण सपकाळे यांनी आपत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. समाजातील गरजू व आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button