
इकरा शाहीन ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियान
जळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी इकरा शाहीन ज्युनिअर कॉलेज येथे ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालयाचे रियाज शाह सर, जाकीर सर, मसूद सर, फरहान सर, तंझीम मिस, सादिया मिस आणि फिरासत मिस यांची उपस्थिती होती. तसेच एच. जे. थिम कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर डॉ. चाँद खान यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
या अभियानात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण करून आपले योगदान दिले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची नियमित देखभाल व संवर्धन करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण, वृक्षांचे महत्त्व आणि भावी पिढीसाठी हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.





