इतर

एच. जे. थीम महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली व तिरंगा प्रतिज्ञा उत्साहात

एच. जे. थीम महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली व तिरंगा प्रतिज्ञा उत्साहात

जळगाव : इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशप्रेम वर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. रॅलीदरम्यान ‘हर घर तिरंगा’, हर घर तिरंगा — हर दिल तिरंगा, तिरंगा हमारी शान, भारत हमारी जान, एक तिरंगा, एक पहचान — मेरा भारत महान, तिरंगे का मान बढ़ाएँ, हर घर तिरंगा फहराएँ, राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि नागरिक कर्तव्यांचा संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.

या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा आणि देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशप्रेमीची भावना व्यक्त केली.
यानंतर महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील शिक्षकांनीही सामूहिकरित्या प्रतिज्ञा घेतली. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवणे, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, असा संकल्प यावेळी करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button