खान्देशगुन्हेजळगांव

तापी नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

तापी नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

मुक्ताईनगर : तापी नदीच्या पात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाण्यात बुडून मृत्यू

पोलिसांच्या नोंदीनुसार, तापी नदीच्या पात्रातील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिकदृष्ट्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. या प्रकरणी BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ओळख पटविण्याचे आवाहन

मृताची ओळख पटविण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि तुषार पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button