ऑनलाईन महिला लोकशाही दिनाचे २१ ऑगस्ट रोजी आयोजन
ई-मेलद्वारे तक्रारी पाठविण्याचे आवाहन
जळगाव l १८ ऑगस्ट २०२३ l जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, समाजातील पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.
या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी खालीलप्रमाणे – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार जळगाव – tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार एरंडोल- erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार धरणगाव- dharangaon2014@gmail.com, तहसीलदार बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार पाचोरा- tahsilpachora@gmail.com, तहसीलदार मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार चोपडा- tahsildarchopda@gmail.com तरी संबंधित तालुक्यातील महिलांनी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांचे ई- मेलवर अर्ज पाठवावे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.