खान्देशजळगांव

सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात कारवाईची मागणी

सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात कारवाईची मागणी

एआयएमआयएम आणि मुस्लिम समाजातर्फे चोपडा पोलिसांना निवेदन; संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चोपडा | प्रतिनिधी

सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) आणि मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.

शुक्रवार, २६ जून रोजी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष आसिफ पटेल यांच्या आदेशानुसार चोपडा एआयएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केले.

निवेदनात नाजिया इलाही यांनी सोशल मीडियावर पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच समाजात तेढ आणि विभाजन निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी एआयएमआयएमचे उपशहराध्यक्ष रिजवान शेख, शाहिद शेख, शाहरुख शाह यांच्यासह पक्षाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मुस्लिम समाजातील हाफिज नसीब साहेब, आबिद राजा खान, अशफाक मेंबर, फैसल सय्यद, सय्यद असद, अली आणि समाजातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button