जळगाव-;- जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार घेताच त्यांनी सहकार्यांचा परिचय करून घेतला.
याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, महसूल, संजय गांधी योजना व पुरवठा नायब तहसीलदार डॉ. राहूल वाघ, निवडणूक नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर आणि डी. बी. जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.