जळगाव : दुचाकीचा कट लागल्याने गाडी हळू चालक बोलल्याचा राग आल्याने ट्रिपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला केला. ही घटना गुरुवार दि. ७ रोजी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास सुभाषचीकात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील फातेमा नगरात आवेश शरीफ खाटीक हा तरुण रिक्षा चालक असून तो सुभाष चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभा होता, दरम्यान, दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्याठिकाणाहून ट्रीपलसीट दुचाकीस्वार जात होते. त्यांचा आवेशला कट लागल्याने आवेश याने गाडी हळू चालव असे म्हणाला, त्याचा राग आल्याने ट्रीपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी आवेशवर चॉपरने हल्ला केला, यामध्ये आवेश गंभीर जखमी झाला,
भरदिवसा आवेशवर चॉपरने हल्ला झाल्यामुळे त्याठिकाणी खळबळ माजून गेली होती. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र हल्लेखोर मात्र तेथून पसार झाले होते. याप्रकरणी आवेश खाटीक याने दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.