जळगाव ;- कंपनीत काम करत असतांना महिलेची साडी मशिनरीच्या पट्टयात अकडल्याने महिलेची मान देखील त्यामध्ये अडकली. यामध्ये महिलेचे शिर धडावेगळे झाल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील मुकेश अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सरस्वती गोविंद ठाकरे उर्फ सरस्वती वीरेंद्रसिंग मोरया (वय ३५, रा. सुहागी ता. खालवा जि. खंडवा ह.मु. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील परप्रांतीय सरस्वती गोविंदा ठाकरे उर्फ सरस्वती वीरेंद्रसिंग मोरया या विवाहिता आपले पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह वास्तव्यास आहे. एमआयडीसी-तील व्ही सेक्टरमध्ये मुकेश अॅग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत असून त्याठिकाणीच ती राहत होती, नेहमीप्रमाणे मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर महिला मजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या. दुपारी जेवण झाल्यानंतर त्या महिल्या मजल्यावर असलेल्या मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्टयात अडकला.
पोलिसांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांनाहवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मातमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.