महाराष्ट्रात १० हजार पोलिसांची भरती ; उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !

महाराष्ट्रात १० हजार पोलिसांची भरती ; उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !
मुंबई:;- पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी मिळणार असून राज्यात १० हजार पोलिस पदांची भरती केली जाणार आहे. गणेशोत्सवानंतर म्हणजेच १५ सप्टेंबरनंतर या भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गृह विभागाने २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील रिक्त पोलिस पदे भरण्यास मान्यता दिली आहे. सध्या उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होईल, त्यामुळे गणेशोत्सवानंतरच मैदानी चाचण्या आणि भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षी १७ हजार पोलिस पदांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते. यंदा १० हजार जागांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.
भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाचे नियम
एका पदासाठी फक्त एक अर्जच ग्राह्य धरला जाईल.. एका उमेदवाराने दोन ठिकाणी अर्ज केल्यास तो बाद केला जाईल. चाचणीदरम्यान उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिल्यास त्याला पात्र ठरवले जाणार नाही.पूर्ण भरती प्रक्रिया सुमारे ४ महिने चालू राहणार आहे.
पोलिस भरतीच्या इच्छुक उमेदवारांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी तयारी सुरू ठेवावी, कारण राज्यभरातून मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.