
पवित्र रमजान महिन्यात सर्विस टू मॅन, इज सर्विस टू गॉड उपक्रम
इकरा शाहीन जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी वृद्ध आणि मतिमंद मुलांशी साधला संवाद
जळगाव: प्रतिनिधी ;– इकरा शिक्षण संस्था द्वारा संचालिका इकरा शाहीन जूनियर कॉलेज मेहरूनमध्ये दर शुक्रवार विद्यार्थ्यांकडून सदकाचे पैसे जमा करण्यात येतात. वर्षभर हे पैसे जमा करून पवित्र रमजान महिन्यात सर्विस टू मॅन, इज सर्विस टू गॉड हा उपक्रम राबविण्यात येतो.
याअंतर्गत दिनांक 13 मार्च रोजी इकरा शाहीन जूनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मातोश्री वृद्ध आश्रम सावखेडा बुद्रुक येथे जाऊन 63 वृद्ध व 40 मतिमंद मुलांना बिस्किट्स ,मोसंबी , केळी आणि सफरचंद देऊन त्यांच्याशी संवाद साधले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले व त्यांनी स्वतः निश्चय केला की आम्ही भविष्यात आमच्या आई-वडिलांकडे खूप लक्ष देणार. इस्लाम धर्मात हे माहित आहे जोपर्यंत आपण आई-वडिलांची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वर्ग मिळणार नाही.
या भेटीत मातोश्री आश्रम च्या व्यवस्थापकांनी व शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केले.या व्यतिरिक्त रमजान महिन्यात विविध गरीब लोकांना पैसे देऊन मदत करण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी रमजान मध्ये राबविण्यात येतो.
या उपक्रमा साठी शाळेतील शिक्षिका खान तंजीम आरा मुजफ्फर खान नेहमी प्रयत्न करते. त्यांच्या सोबत शाळेतील सर्व शिक्षकांचे सहभाग असतो. यावेळी प्राचार्य काझी जमीर शिक्षक शेख जाकीर, शेख सोहेल अमीर, शेख सोहेल शकील, खान मुस्तकीम, शेख मसूद, खान तन्झिम , शेख सुमय्या उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार व उपाध्यक्ष डॉक्टर इकबाल शहा सर तसेच इकरा शिक्षण संस्था चे सर्व पद अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांच्या या कार्याबद्दल अभिनंदन करतात करतात.