खान्देशगुन्हेजळगांव

धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या एका दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (१ मे) सकाळच्या सुमारास घडली. या चोरीचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रथम घटना प्रेमनगर भागातील मंदिराजवळ घडली. पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) या मॉर्निंग वॉक करत असताना एक चोरटा पायी चालत आला व त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवर बसून पसार झाला.

याच दरम्यान, दुसरी घटना फॉरेस्ट कॉलनीजवळील रस्त्यावर घडली. संगीता राजेश कडे (वय ५२, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) यांच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळीही अशाच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावून लंपास केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्टपणे दिसून येत असले तरी त्यांच्या वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button