इतर

लग्नाचे अमिष देत तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

लग्नाचे अमिष देत तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

जळगाव | लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, रामानंद नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते मे २०२५ दरम्यान जळगावातील एका हॉटेलमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

गौरव मुकुंद साठे (रा. बोदवड) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी त्याची ओळख झाली होती. त्यानंतर गौरव साठे याने तिला लग्नाचे आमिष दाखवत जळगावातील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी गौरव साठे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button