वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
भडगाव तालुक्यात वाक येथे महसूल विभागाची कारवाई
भडगाव प्रतिनिधी l तालुक्यातील वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या पथकाने सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पकडून कारवाई केली आहे. हे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
या कारवाई बद्दल बोलताना ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दंडात्मक कारवाई करण्यात येऊन ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम जे खाटीक, अभिमन्यू वारे आदींनी केली.
यावेळी पथक हे खाजगी गाडीत रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरचा पाठलाग करत होते. परंतु ते त्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला परंतु त्यावरील चालक हा रस्त्याची व वाहतुकीची परवा न करता सुसाट पारोळ्याच्या दिशेने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर घेऊन फरार झाला. हे डंपर पळाले जरी असले तरी त्यावर येत्या काही दिवसात कारवाई नक्की होणार आहे.
तसेच गिरणा नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असे, यावेळी महसूल विभागांना माहिती देण्यात आली.