भावनांनी भरलेला बोकडाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल; मालकाच्या मिठीत रडणाऱ्या बकऱ्याने भावूक केलं

भावनांनी भरलेला बोकडाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल; मालकाच्या मिठीत रडणाऱ्या बकऱ्याने भावूक केलं
सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओची चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) – प्राण्यांनाही भावना असतात हे वारंवार सिद्ध होत आले आहे. माणसासारखी बोलता न येणारी ही जीवसृष्टीदेखील आपलं दुःख, प्रेम आणि ओढ अशा विविध भावना त्यांच्या कृतीतून व्यक्त करत असते. याचे एक भावनिक उदाहरण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://x.com/i/status/1547828079036207105
या व्हिडीओमध्ये दिसतं की, ईदच्या निमित्ताने विक्रीसाठी बाजारात आणलेला एक बकरा, आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरश: हुंदके देत रडू लागतो. त्याच्या डोळ्यांतील अश्रू, मालकाला घट्ट मिठी मारणं आणि आक्रंदन पाहून अनेकांनी डोळे पुसले. हे दृश्य उपस्थितांना इतकं भावून गेलं की, काही वेळासाठी सगळ्यांचे मन भरून आले.
हा व्हिडीओ 2022 साली प्रथम समोर आला होता. मात्र, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या बकऱ्याच्या भावनांना दाद देत व्हिडीओला भावनिक प्रतिसाद दिला आहे.
ही घटना नेमकी कुठे घडली होती, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, व्हिडीओतील भावनिक क्षण सोशल मीडियावरून झपाट्याने पसरले असून, प्राणी आणि माणसातील नात्याचा हृदयस्पर्शी अनुभव पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात येत आहे.