खान्देशगुन्हेजळगांव

सुवर्णपेढ्यांत हातचलाखीने लाखोंचा गंडा ; सीसीटीव्हीत आरोपी महिला कैद

सुवर्णपेढ्यांत हातचलाखीने लाखोंचा गंडा ; सीसीटीव्हीत आरोपी महिला कैद 

जळगाव प्रतिनिधी :शहरातील सुवर्णपेढ्यांत हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या ‘लेडी स्नॅचर’चा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. केवळ एका दिवशी तीन सुवर्णपेढ्यांतून साडेचार लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याने या महिलेचा गुन्हेगारी अनुभव स्पष्ट दिसून येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिरव्या पंजाबी ड्रेसमधील ही महिला प्रत्येक ठिकाणी एकाच युक्तीने सेल्समनचे लक्ष विचलीत करून नकली अंगठ्या ठेवताना आढळली आहे. या घटनांनंतर व्यापारी वर्गाने सुरक्षा उपाय वाढविण्याचे ठरवले असून, पोलिसांनी तिला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुभाष चौकातील आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली महिला अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आली. सेल्समनचे लक्ष विचलीत करून तिने १ लाख ८५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आणि नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या.

यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तीच महिला भंगाळे गोल्ड ज्वेलर्समध्ये गेली आणि त्याच पद्धतीने १ लाख ४५ हजार रुपयांची अंगठी चोरून नेली.

दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ६ ते ७ दरम्यान तिने आणखी एका सुवर्णपेढीत १ लाख ४० हजार रुपयांची अंगठी लंपास केली. तिन्ही घटनांमध्ये एकाच महिलेचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, पोलिसांनी तिच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यातील तपास पोहेकॉम प्रदीप नन्नवरे करीत आहेत.दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुभाष चौकातील आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली महिला अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आली. सेल्समनचे लक्ष विचलीत करून तिने १ लाख ८५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आणि नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या.
यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तीच महिला भंगाळे गोल्ड ज्वेलर्समध्ये गेली आणि त्याच पद्धतीने १ लाख ४५ हजार रुपयांची अंगठी चोरून नेली.
दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ६ ते ७ दरम्यान तिने आणखी एका सुवर्णपेढीत १ लाख ४० हजार रुपयांची अंगठी लंपास केली. तिन्ही घटनांमध्ये एकाच महिलेचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, पोलिसांनी तिच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यातील तपास पोहेकॉम प्रदीप नन्नवरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button