खान्देशजळगांव

कामगार कल्याणकारी मंडळावर शासकीय सदस्यपदी इस्माईल खान यांच्या नियुक्तीची मागणी

कामगार कल्याणकारी मंडळावर शासकीय सदस्यपदी इस्माईल खान यांच्या नियुक्तीची मागणी

बिल्डिंग पेंटर असोसिएशनतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

जळगाव प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जळगाव समितीवर शासकीय सदस्यपदी इस्माईल खान कयूम खान यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बिल्डिंग पेंटर असोसिएशन युनियनतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज ( श्रीमंत चावरकर, उप जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, ही युनियन मागील पाच वर्षांपासून नोंदणीकृत असून, ती बांधकाम कामगारांसाठी सक्रियपणे कार्य करत आहे. युनियनने शासकीय योजना विविध कार्यक्रमांद्वारे कामगारांपर्यंत नि:स्वार्थपणे पोहोचविल्या आहेत. कामगारांच्या हितासाठी सुरू असलेल्या या कार्याचा विचार करून, कल्याणकारी मंडळात इस्माईल खान यांची शासकीय सदस्यपदी नियुक्ती व्हावी, अशी विनंती उप जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

निवेदन देतेवेळी बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल भाई खानयांच्यासह जळगावचे अध्यक्ष महेश मस्के, जळगाव जिल्हा सदस्य अजमल खान, जिल्ह प्रभारी अमीर मिरची, कार्याध्यक्ष रोशन शहा, कार्याध्यक्ष भगवान पाटील पेंटर जळगाव, उपाध्यक्ष फुलमारी भाऊ, विभाग प्रमुख आणि सर्व बिल्डिंग पेंटर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button