खान्देशजळगांव

समुपदेशनातून जिल्हा परिषदेत ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पारदर्शक प्रक्रिया

समुपदेशनातून जिल्हा परिषदेत ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पारदर्शक प्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सोमवार, दि. ११ मे रोजी शाहू महाराज सभागृहात समुपदेशन पद्धतीने पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करत पदस्थापना निश्चित केली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पारदर्शक प्रक्रियेमुळे समाधान

जिल्हा परिषद प्रशासनाने बदली प्रक्रिया पारदर्शक, समन्वयात्मक आणि न्याय्य पद्धतीने राबविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.

पशुधन व लेखा विभागातील बदल्या

पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर २ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील १ प्रशासकीय व १ विनंती बदली झाली. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ विनंती बदली करण्यात आली.

परिचर व इतर संवर्गातील बदल्या

परिचर संवर्गातील १० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) तसेच वाहन चालक संवर्गातील प्रत्येकी १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या

आरोग्य सेवक संवर्गातील ४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १४ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर २ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेविका संवर्गातील २१ प्रशासकीय, ११ विनंती आणि १ आपसी बदली करण्यात आली.
आरोग्य सहाय्यक संवर्गातील ६ पुरुष
कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील २ प्रशासकीय व ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

औषध निर्माण व प्रयोगशाळा विभाग

औषध निर्माण अधिकारी संवर्गातील २ प्रशासकीय तर ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली.

एकूण ९७ बदल्या पूर्ण
एकूण प्रक्रियेत जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील ३९ प्रशासकीय, ५५ विनंती आणि ३ आपसी अशा एकूण ९७ बदल्या समुपदेशनाद्वारे पूर्ण करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button