इतर

लोखंडी कोयता घेऊन दहशत माजविणारा तरुण गजाआड

लोखंडी कोयता घेऊन दहशत माजविणारा तरुण गजाआड

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून लोखंडी तलवार व कोयता जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमध्ये आकाश सुरेश शिंदे (वय २१, रा. साईनगर) हा तरुण लोखंडी कोयता हातात घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धमकावत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी ५ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली.
कारवाईदरम्यान आकाश शिंदे याच्याकडून एक लोखंडी तलवार व एक धारदार कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button