इतर

विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय ट्विस्ट; अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय ट्विस्ट; अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी मोठा राजकीय निर्णय घेत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची घडामोड घडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, नगरसेवक बबन पोकळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चौधरी म्हणाले की, “यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी मला उमेदवारी मागे घेण्याबाबत संपर्क साधला होता. त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचाही फोन आला. त्यांनी मला महायुतीच्या उमेदवारासाठी थांबण्याची विनंती केली. नंदकिशोर महाजन हे माझे मित्र असल्याने त्यांच्या समर्थनार्थ हा निर्णय घेतला आहे.”

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, “विदर्भातील राजकीय जबाबदारी आमदार बच्चू कडू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनिल चौधरी यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. तसेच लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button