खान्देशजळगांव

कासमवाडीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

कासमवाडीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाव; इंजेक्शनसाठी हेलपाटे मारावे लागल्याचा पालकांचा आरोप

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून रविवारी मोहम्मद मिर्झा (वय साडेतीन वर्षे) या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि आयुक्तांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली असली तरी प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रविवारी कासमवाडी परिसरातील साडेतीन वर्षीय मोहम्मद मिर्झा याच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याला जखमी केले. घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन मिळविण्यासाठीही हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button