भुसावळ : गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्या अंजाळेतील संशयिताला पोलिसांनी शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास यावल नाक्यावर अटक केली. रोहित सुनील सपकाळे (21, अंजाळे, ता.यावल) असे आरोपीचे नाव आहे.
अंजाळेतील रोहित सपकाळे हा गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचला. शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रोहित सपकाळे (21, अंजाळे) हा यावल नाक्यावर दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.2798) आल्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतील दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी कॉन्स्टेबल शैलेंद्र लक्ष्मण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार सैय्यद ईकबाल करीत आहेत.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय सैय्यद इकबाल, नाईक जाकीर मसुरी, कॉन्स्टेबल संजय ठाकणे, एएसआय जाकीर सैय्यद आदींच्या पथकाने केली.