सामाजिकराजकीय

अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशनतर्फे २६ जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l २४ जुलै २०२६ l राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून जळगाव शहरात २२ जुलै ते २८ जुलै २०२६ दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या जनसेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेदरम्यान शनी पेठ येथील गाफार मलिक हाऊस येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

🏥 आरोग्य शिबिरात मिळणाऱ्या मोफत सुविधा:

 तपासण्या: हृदयविकार मार्गदर्शन, रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar/Diabetes), ईसीजी (ECG), नेत्र व मोतीबिंदू तपासणी, हाडे व सांधे विकार, तसेच त्वचेचे विकार तपासणी.

 विशेष मार्गदर्शन: महिला आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन.

 मोफत उपचार: तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वाटप, आणि आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) व्यवस्था.

🩸 भव्य रक्तदान शिबीर:

या प्रसंगी ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ या संदेशासह रेड प्लस ब्लड बैंक (डॉ. मोईज देशपांडे सर) यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडणार आहे.

या शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांनी जळगाव व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा व रक्तदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button