इतर

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्येप्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्येप्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

जळगाव,मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व ‘व्याकरणगुरू’ प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रा. यास्मिन शेख यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे सात दशके मराठी भाषेची सेवा केली. अध्यापनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण व भाषाशास्त्राचे ज्ञान देतानाच ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखन कोश’ आणि ‘सुगम मराठी व्याकरण कोश’ यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी प्रमाण मराठी व शुद्धलेखनाला महत्त्वपूर्ण दिशा दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल विद्यार्थ्यांनी प्रा. यास्मिन शेख यांच्या प्रतिमेला नमन करून पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देताना मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम, ज्ञानसाधना आणि भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले अथक कार्य यांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मातृभाषेचा आदर करावा, शुद्ध व प्रमाण मराठीचा वापर करावा, हा त्यांच्या कार्यातून मिळणारा प्रेरणादायी संदेश अधोरेखित करण्यात आला.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा महोदया सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “भाषेला कुठलाही धर्म नसतो. भाषा ही माणसांना जोडणारी, विचारांना दिशा देणारी आणि संस्कृतीला समृद्ध करणारी असते,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देताना मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम, ज्ञानसाधना आणि भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले अथक कार्य यांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मातृभाषेचा आदर करावा, शुद्ध व प्रमाण मराठीचा वापर करावा, हा त्यांच्या कार्यातून मिळणारा प्रेरणादायी संदेश अधोरेखित करण्यात आला.
या वेळी प्रा. यास्मिन शेख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “आपल्या मातृभाषेवर प्रेम करा” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button