खान्देशजळगांवसामाजिक

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

शहरातील चार ब्लॉक अध्यक्षांसह २५ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता काँग्रेस भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीषदादा चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. अरविंद कोलते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस मुक्ती हरुन, जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर करीम सालार, रावेर पूर्व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. ईश्वरी राठोड उपस्थित होते.

चार ब्लॉक अध्यक्षांसह २५ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र

या कार्यक्रमात जळगाव शहरातील चार ब्लॉक अध्यक्षांसह शहर कार्यकारिणीतील २५ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जमील शेख यांची प्रस्तावना

कार्यक्रमाची प्रस्तावना जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी केली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळी, विशाल पवार आणि संदीप घोरपडे यांनी केले, तर आभार जगदीश भाऊ गाडे यांनी मानले.

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राहुल भालेराव, अनंत परिहार, उद्धव वाणी, प्रदीप सोनवणे, देविदास ठाकरे, आशितोष पवार, सागर सपके, राजेश कोतवाल, सखाराम मोरे, कपिल अहमद, राजेश मंडोरा, नुर देशमुख, विष्णू घोडेस्वार, मनोज वाणी, मीराताई सोनवणे, अरुणा पाटील, मालोजी पाटील, युवराज खडके, कामिल खान, डॉ. सज्जाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button