खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

खाकी पलीकडचे जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन

खाकी पलीकडचे जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृती व कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय वेध

पाचोरा प्रतिनिधी एस .एस. एम. एम. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुवर्णा पाटील लिखित ‘खाकी पलीकडचे जीवन : पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्य संस्कृतीचा आणि कुटुंब जीवनाचा मानसशास्त्रीय वेध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पी.टी.सी. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन आदरणीय नानासो संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो व्ही.टी .जोशी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे व्ही. पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीसोबतच त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेणारे हे पुस्तक आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण, अनिश्चित कामाचे स्वरूप, कर्तव्य आणि कौटुंबिक जीवनातील समतोल, तसेच पोलीस पत्नी, मुले आणि कुटुंबीयांचे अनुभव यांचा पुस्तकात संवेदनशीलतेने विचार करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनात्मक माहितीबरोबरच केस स्टडी, अनुभवकथन आणि भावनिक प्रसंगांच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा मानवी पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे उभ्या असलेल्या कुटुंबाच्या निःशब्द योगदानालाही या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. सुवर्णा पाटील या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. राजेंद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. पोलीस कुटुंबाचा एक भाग म्हणून अनुभवलेले वास्तव, निरीक्षणे आणि संशोधनात्मक दृष्टिकोन यांची सांगड घालत त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना, जबाबदाऱ्या आणि समायोजनाचा पैलूही पुस्तकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रा. डॉ. सुवर्णा पाटील यांच्या पुस्तक लेखनाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधनात्मक व साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर पुस्तकाच्या लेखिका डॉ.सुवर्णा पाटील लेखिका ह्या असुन त्या सेवानिवृत्त स.फौ.सुभाष सर्जेराव पाटील यांच्या सुकन्या आहेत आणि त्या पो.हे.कॉ. राजेंद्र पाटील नेमणुक पिंपळगाव पो.स्टे. यांच्या पत्नी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button