खान्देशगुन्हेजळगांव

६४.४४ ग्रॅम एमडीसह सराईत गुन्हेगार जेरबंद

पाळधी-तरसोद बायपास परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन संशयितांचा शोध सुरू

६४.४४ ग्रॅम एमडीसह सराईत गुन्हेगार जेरबंद

पाळधी-तरसोद बायपास परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन संशयितांचा शोध सुरू

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाळधी-तरसोद बायपासलगत कचरा फॅक्ट्री परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. अजय बिरजू गारुंगे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे १ लाख ९३ हजार ३२० रुपये किमतीचा एमडी आणि २० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पाळधी-तरसोद बायपासलगतच्या कचरा फॅक्ट्री परिसरात संशयित अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून अजय गारुंगे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६४.४४ ग्रॅम एमडी आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अजय गारुंगे हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एमडी अंमली पदार्थ बाळगणे व विक्री, गांजा बाळगणे व विक्री, घरफोडी यांसह विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्याच्यासोबत असलेल्या आणखी दोन संशयितांचा शोध सुरू असून, त्यांचा सहभाग तपासला जात आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील, सहायक फौजदार अतुल वजांरी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अकरम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे तसेच तांत्रिक पथकातील पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद जाधव, गौरव पाटील आदींनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button