खान्देशजळगांवसामाजिक

‘प्रहार’च्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी जळगावकरांच्या भेटीला!

११ ऑक्टोबरला खासदार उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती; शिवरायांच्या पुतळ्यापासून संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली

‘प्रहार’च्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी जळगावकरांच्या भेटीला!

११ ऑक्टोबरला खासदार उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती; शिवरायांच्या पुतळ्यापासून संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली

जळगाव, प्रतिनिधी : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगावकरांच्या भेटीला येणार आहेत. या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी शहरातील चित्रपटप्रेमींना मिळणार असून, त्यांच्या आगमनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ‘प्रहार’ चित्रपटातील प्रमुख कलाकारांसह खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.

‘प्रहार’ चित्रपटातून खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा संघर्षमय प्रवास आणि न्यायव्यवस्थेतील योगदान प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाबाबत चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. जळगावातील कार्यक्रमादरम्यान या दोन्ही कलाकारांशी संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत.

समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, अॅड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे.

जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी आणि चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button