खान्देशजळगांव

प्रभाग १५ मधील समस्यांबाबत काँग्रेसचे महापौरांना निवेदन

तीन दिवसांत प्रभागाचा दौरा करून समस्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन

प्रभाग १५ मधील समस्यांबाबत काँग्रेसचे महापौरांना निवेदन

तीन दिवसांत प्रभागाचा दौरा करून समस्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील पाच प्रमुख मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी पुढील तीन दिवसांत प्रभागाचा दौरा करून समस्यांची पाहणी व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी दिली.

स्ट्रीट लाइटच्या समस्येवरही चर्चा

प्रभागातील विविध समस्यांसोबतच जळगाव शहरातील स्ट्रीट लाइटच्या प्रश्नावरही यावेळी चर्चा करण्यात आली. निवेदनात या समस्येचाही उल्लेख करण्यात आला असून, शहरातील पथदिव्यांची समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन महापौरांनी दिल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पदाधिकारी उपस्थित

निवेदन देताना ब्लॉक अध्यक्ष राहुल भालेराव, अनंत परिहार आणि विशाल पवार, चंद्रकांत पाटील, सखाराम मोरे, मालोजी पाटील, देविदास ठाकरे, विजय वाणी, अरुणाताई, अनिता कोळी, विनोद भोपे, नाना भोई आणि हेमंत खाचणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button