खान्देशजळगांवसामाजिक

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या अवमानप्रकरणी शायना एनसी यांचा शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या अवमानप्रकरणी शायना एनसी यांचा शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध
जळगाव : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शायना एनसी यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी मराठी माणूस, हिंदुत्व आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा लोकनेत्यांच्या छायाचित्राचा अवमान होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून, यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मनीषा पाटील, माजी नगरसेविका पार्वता भील, विभागप्रमुख किरण भावसार, शरीफ रंगरेज, बापू मेने, किरण ठाकूर, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील, सुनीता सपकाळे, रुचिका सपकाळे, शोभा महाजन, अरुणा घुगे, ज्योती घुगे, वैशाली शिंपी, सुरेखा कोळी, दीपाली घुगे, रेखा पाटील, संगीता पाटील, सिंधू शिंदे, सरला सोनार, अनिता मांडवे यांच्यासह शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button