खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळात घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

भूसावळ ;- बंद घर फोडून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील पटेल कॉलनी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, इम्तीयाज मोहम्मद युनूस बागवान वय ४० रा. खडकारोड, पटेल कॉलनी भुसावळ हे व्यववसायिका असून ते परिवारासह रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते.

अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा संधी साधून घरातून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. इम्तीयाज बागवान हे रात्री ८.३० वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भोये हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button